About us

SSWFM > About us

सुतार समाज वेलफेअर फाऊंडेशन

बांधकाम क्षेत्रातील सुतार, लोहार, शिल्पकार, बांबू कामगार आणि इतर तंत्रज्ञ आणि कारागीरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रम राबविले जावेत असा विचार केला गेला तेव्हा सहकारी संस्था स्थापन करून आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री उभारून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्षेत्रात प्रामुख्याने काम करणाऱ्या कारागीर, तंत्रज्ञ आणि स्थानिक जाती गटांचा व्यापक अभ्यास करण्यात आला. विविध निरीक्षणे, सद्यस्थिती आणि उपलब्ध आकडेवारीनुसार अभ्यास केला असता, अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत. प्रत्यक्ष कारागीर, कार्यकर्ते, समुदाय नेते आणि तज्ञांच्या सहभागाने एक अभ्यास बैठक आयोजित करण्यात आली आणि अतिशय वैज्ञानिक पद्धतीने (म्हणजे SWOT विश्लेषण करून) विचारमंथन करण्यात आले. उपलब्ध समस्यांचा विचार करून, मूळ कारण शोधून आणि विचार करून, काही उपाय समोर आले आहेत. तथापि, असा निष्कर्ष काढण्यात आला की सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सहकारी तत्त्वावर आणि कार्यावर संघटना स्थापन करणे. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करता येते. कामगार, कारागीर, तंत्रज्ञ आणि संबंधित व्यावसायिकांनी एकत्र येऊन किमान ५१ लोकांची सहकारी संस्था स्थापन करून काम सुरू करावे. खरं तर, ही संकल्पना अशी आहे की एका तालुक्यातून किंवा तत्सम भौगोलिक क्षेत्रातील १०० ते १५० लोकांच्या सहभागाने सहकारी तत्वावर एक संघटना स्थापन करावी.

भूक जगाला वेढत आहे

ध्येय आणि दृष्टी

उद्देश

सुतार समाज. हा एक महत्त्वाचा सेवा पुरवणारा घटक आहे. पूर्वी बलुतेदारी पद्धतीमध्ये गाव खेड्यामध्ये शेती अवजारे निर्मिती दुरुस्ती व बांधकाम क्षेत्रातील कामे करून उदरनिर्वाह होत होता पण नवीन तंत्रज्ञानामुळे व एकंदरीत बदलत्या परिस्थितीमुळे काम उपलब्ध होत नसल्याने चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला. काहींनी शहराकडे स्थलांतर करून तर काहींनी गावातच विविध मजुरी किंवा उपलब्ध होईल ती कामे करून उदरनिर्वाह करत आहे. स्थावर मालमत्ता म्हणजेच शेती नसलेला हा समाज अतिशय हालाखीच्या स्थितीत जीवन कंठत आहे. या सर्व कारागीर घटकांसाठी एक समर्थन प्रणाली म्हणून काम करण्याचा विचार आहे.

problem of livelihood arose due to the lack of work. Some have migrated to the city and some are earning a living by doing various wage jobs or whatever work is available in the village. This society, which does not have real estate, i.e. agriculture, is living in a very difficult situation. The idea is to work as a support system for all these artisan groups.

ध्येय

सुतार, लोहार, पाथरवट, ताम्रकार, कुंभार, बुरुड, चर्मकार तसेच अनेक असंघटित क्षेत्रातील कारागिरांचे जीवनमान उंचावणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधणे.

धोरण

लोकसंघटन करुन विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थींना मिळवून देण्यासाठी, प्रत्येक तालुका पातळीवर या लोकांच्या कायम संपर्कात राहणे. कागदपत्रांची पूर्तता करणे योजनांची माहिती देऊन निवड करणे व लाभ मिळवून देणे. जाणीव जागृती करणे, माहितीचे आदान प्रदान करणे व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधून कार्यवाही करणे.

क्षमता व कौशल्य आधारित व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे यासाठी आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण देणे. उद्योजकता वाढीसाठी वैयक्तिक, गटामध्ये अथवा सहकारी संस्था माध्यमातून, उद्योग व्यवसाय संकल्पना पुर्ण करण्यासाठी त्यांना मदत, सहकार्य आणि मार्गदर्शन करणे व सोबत संबंधित योजनेचा लाभ मिळवून देणे. तालुका पातळीवर "विकासदूत" यंत्रणेमार्फत माहितीनुसार प्रश्नांची सोडवणूक करणे.

कार्यपद्धती

यामध्ये प्रत्येक स्थानिक पातळीवर संस्था, संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने "विकासदूत" नेमून कार्य पुढे नेणारी यंत्रणा निर्माण करणे. प्रत्येक तालुक्यात समन्वयासाठी ज्येष्ठ अथवा तज्ञ व्यक्तींना विनंती करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे. महाविद्यालयीन विद्यार्थी अथवा नुकतेच शिक्षण संपवून नोकरी शोधत आहे असे तरुण किंवा ज्यांना करिअर म्हणून ई-सेवा केंद्र चालू करायचे आहे त्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे. ई-सेवा केंद्र स्वतःच्या पैशाने, क्षमतेनुसार सुरू करावे, हि अपेक्षा आहे. ई-सेवा केंद्र चालू करण्यासाठीची अर्थिक क्षमता नसेल तर संबंधित क्षेत्रातील संघटना कार्यकारिणी मदत घ्यावी लागेल. स्थानिक कार्यकारिणी देखील तेवढी सक्षम नसेल तर किंवा स्थानिक संघटना उपलब्ध नसेल तर सुतार समाज वेल्फेअर फौंडेशन याकामी पुढाकार घेऊन मदत करील. यापैकी काहीच शक्य होत नाही हे लक्षात आले तर उपलब्ध ई-सेवा केंद्राशी बोलणी करून अधिकृत किंमतीत किंवा सवलतीच्या दरात कामे करून घेणे. "विकासदूत" स्थानिक असल्याने त्यांना संबंधित कुटुंबांची माहिती असणार आहे, नसेल तर स्थानिक संघटना व समन्वयक उपलब्ध करून देतील. तालुका पातळीवर समाजातील सर्वांची माहिती संकलित करून ठेवणे व त्यांच्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे. अपडेट करणे तसेच आवश्यकतेप्रमाणे नव्याने मिळवणे. स्थानिक पातळीवर नियमितपणे मिटिंग आयोजित करुन, अजेंडा ठरवून त्याप्रमाणे चर्चा, निर्णय घेण्यात येऊन कामकाज करणे. या सर्वांचा मिटिंग अहवाल, कार्य अहवाल व अर्थिक अहवाल तयार करणे. सहभागींच्या मागणी व गरजेनुसार सहकार्य, मार्गदर्शन करणे तसेच आवश्यकतेनूसार प्रशिक्षण उपलब्ध करणे. संस्थेच्या ध्येय,धोरण, कार्यप्रणाली नूसार विविध उपक्रम राबविण्यात यावेत.

कार्यप्रणाली

संस्थेच्या रचनेत कार्य संचालनासाठी अध्यक्ष, सचीव, खजिनदार व चार संचालक असे कार्यकारी मंडळ असेल. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असल्याने सहा विभाग प्रमुख असतील, यामध्ये मुंबई, कोकण, प.महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र असे विभाग असतील.

प्रत्येक जिल्ह्यात एक संपर्क प्रमुख व प्रत्येक तालुक्यात एक तालुका संपर्क प्रमुख असेल व आवश्यकतेप्रमाणे मोठे शहर अथवा भौगोलिक परिस्थिती नूसार अतिरिक्त प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात येईल. हे सर्व स्वंयसेवी, सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते असतील. प्रत्यक्ष कामकाज करणे व वरील रचना यांचे सहकार्य, मार्गदर्शन मदत घेऊन नियमित व सातत्यपूर्ण काम हे समाज "विकासदूत" करतील व स्थानिक संघटना कार्यकारिणीचा सातत्याने काम करता येत नाही व वेळ देता येत नाही हि अडचण दूर होईल. यामुळे संघटना कामकाज संचालन करतानाच किमान एक हजार युवक-यूवतींना अर्थार्जनाची व समाज कार्याची संधी मिळेल, थोडक्यात त्यांना पुरेसा रोजगार मिळेल