Projects
सुतार समाज वेलफेअर फाउंडेशन
प्रत्येकाचे ज्ञान, कौशल्य,आवड व उपलब्ध साधने, संधी यानूसार उद्योग निवड करुन त्यांना उद्योगासंबंधी सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी व साधने उपलब्ध होण्यासाठी समर्थन प्रणाली म्हणून काम करणे (कन्सल्टिंग सर्व्हिस उपलब्ध करणे).
वरील प्रकारची सेवा ही वैयक्तिक उद्योग, गटामध्ये (कंपनी स्थापन करून) व सहकारी संस्था स्थापन करून अशा तीनही प्रकारासाठी उपलब्ध करून दिली जाईल.
स्थानिक उपलब्धता, गरजा, संधी यानूसार उद्योग निवड केली जाईल पण सर्वाधिक कौशल्य, ज्ञान उपलब्ध असल्याने फर्निचर उत्पादक कारखाने यामध्ये वुडन, स्टील, प्लास्टिक, प्लायवूड यापासून होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने निर्माण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
फर्निचर, फॅब्रिकेशन, ॲल्युमिनियम, ग्लास, शिल्पकला, प्लास्टिक व विविध कलात्मक वस्तू निर्मिती करणारे यूनीट यामध्ये समावेश असेल. कारखाना, प्रोकुरमेंट, मार्केटिंग, संशोधन, सुविधा व्यवस्थापन या स्वरूपात चालेल. यासाठी कामे मिळवून योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी व विक्री करण्यासाठी शोरुम यंत्रणा निर्माण केली जाईल. कारखाना साखळी निर्माण झाल्यानंतर पुरक उत्पादन व सेवा निर्माण करण्याचा विचार आहे.
सर्व कारागीर घटकांसाठी, शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलांना करिअर गाईडन्स उपलब्ध करून दिले जाईल व प्रत्यक्ष सहकार्य केले जाईल.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बचत गट स्थापन करून सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जातील. उद्योग उभारणी करण्यासाठी व व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
महिलांचे विविध प्रश्न सोडविणे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही व त्यांच्या साठी चांगले वातावरण निर्माण करणे यासाठी प्राथमिकता दिली जाईल. काही प्रश्न किंवा अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामध्ये मदत, सहकार्य, मार्गदर्शन केले जाईल व आवश्यकतेप्रमाणे मोफत कायदेशीर सल्ला मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येईल. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातील व महिलांना सर्वत्र संधी व प्रतिनिधित्व दिले जाईल.
बांधकाम कामगार व कारागीर या सर्वांचे संबंधित योजनेत रजिस्ट्रेशन करुन त्याचप्रमाणे मुदत संपलेल्यांचे नुतनीकरण करून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील व त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येतील.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न जटील होत आहे यासाठी पुरक उपक्रम राबविण्यात येतील. तसेच विविध पातळ्यांवर, गटांमध्ये, कार्यक्रमांत प्रबोधन करण्यात येईल यामध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
समाजात एकता, एकोपा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. विसंवाद निर्माण होणार नाही व झालेच तर समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल व यासाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच विविध नेत्यांची जयंती, स्मृती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच विश्वकर्मा प्रकट दिन, स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन यासारखे राष्ट्रीय सण समारंभ व विशेष औचित्य असलेले दिन साजरे केले जातील.
विद्यार्थी व पालकांसाठी तज्ञांच्या सहाय्याने शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येईल व शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत असतील तर आवश्यक खर्चासाठी अर्थिक मदत मिळवून देण्यात येईल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांनी या कामात पुढाकार घ्यावा.
चांगले आरोग्य असावे यासाठी आहार, व्यायाम, सवयी, व्यसन निर्मुलन यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. आरोग्य समस्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी केली जाईल व आरोग्य विम्यासाठी माहिती दिली जाईल. गंभीर आजार अथवा अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांनी या कामात पुढाकार घ्यावा.
विवाह पुर्व मार्गदर्शन करण्यात येईल व विवाहोत्तर काही प्रश्न निर्माण झाला तर समुपदेशन सेवा उपलब्ध केली जाईल. याचबरोबर विवाह इच्छुक मुला-मुलींचे आवश्यक माहिती संकलित करून परफेक्ट मॅचींग सिस्टीम पद्धतीने स्थळ सुचविले जातील. याचबरोबर विवाह जुळविताना कोणती काळजी घ्यावी व कोणत्या गोष्टींची खातरजमा करावी, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे याचे मार्गदर्शन केले जाईल. विवाह जुळुन आले आहेत त्यांना सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन त्यामध्ये सहभागी करता येईल व अगदी माफक म्हणजेच नाममात्र अगदी शंभर रुपयांत विवाह करून दिले जातील. समाजातील विवाह जुळवणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन या उपक्रमास हातभार लावावा.
समाज बांधवांना अनेकदा कायदेशीर मदतीची गरज पडते यावेळी पैसे उपलब्ध नसल्याने अन्याय सहन करावा लागू नये व पुढील काळात त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जातील. शिवाय अनेक उपक्रम राबविताना कायदेशीर सल्ला मार्गदर्शन यांची आवश्यकता असते अशा वेळी ही सेवा उपलब्ध करून दिले जातील. समाजातील वकील बांधवांनी या संदर्भात पुढाकार घ्यावा त्यासाठी प्रयत्न राहतील.
कोणावर अन्याय होत असेल, झाला असेल तर त्याविरुद्ध संबंधिताला साथ देणे, शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे दाद मागणे, पाठपुरावा करणे व गरजेनुसार आंदोलन केले जाईल. तसेच कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल. पोलीस यंत्रणेत काम करणाऱ्या समाज बांधवानी या कामात आपला हातभार लावावा.
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आपत्तीग्रस्तांना मदत सहकार्य केले जाईल. समाजातील धन दांडग्या व्यक्तींनी सढळ हस्ते या परिस्थितीत मदत करावी.
(Agriculture and Allied/Agri-based Businesses)
हे भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत.
खाली त्यांची सविस्तर माहिती दिली आहे:-
१. शेती (Agriculture): शेती म्हणजे जमिनीवर अन्नधान्य, फळे, भाजीपाला, धान्य, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फुलं इत्यादींची लागवड व उत्पादन घेणे.
मुख्य प्रकार:अन्नधान्य उत्पादन: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका
डाळी व कडधान्य: हरभरा, उडीद, मूग, तूर
भाजीपाला शेती: टोमॅटो, वांगी, मिरची, गाजर, कांदा
फळबाग शेती: केळी, संत्री, आंबा, पेरू, डाळिंब
फुलशेती: गुलाब, झेंडू, शेवंती)
२. शेती पूरक व्यवसाय (Allied Agricultural Activities): हे व्यवसाय शेतीस पूरक असून, शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना चालना देतात.
प्रमुख शेती पूरक व्यवसाय:
(१) दुग्धव्यवसाय (Dairy Farming): गाई-म्हशींचे संगोपन करून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री.
उत्पादन: दूध, ताक, लोणी, तूप
तसेच शेण हे नैसर्गिक खत म्हणुन वापरतात येते व गोवर्या हे ही उपयोगात आणता येतात.
(२) कुक्कुटपालन (Poultry Farming): कोंबड्यांचे पालन करून अंडी व मांस उत्पादन. ब्रॉयलर आणि ओमेगा थ्री प्रकार.
(३) शेळीपालन (Goat Farming): कमी खर्चिक आणि नफा देणारा व्यवसाय. शेळ्यांचे दूध, मांस आणि खत उपयोगी.
(४) मत्स्य व्यवसाय (Fish Farming): तलावांमध्ये किंवा कृत्रिम टाक्यांमध्ये मासे वाढवणे. ग्रामीण भागात जलस्रोतांचा उपयोग करून नफा कमावता येतो.
(५) मधमाशी पालन (Beekeeping): मध व मेण उत्पादनासाठी मधमाश्या पाळणे. परागसिंचनाद्वारे पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत.
(६) गांडूळखत निर्मिती (Vermicomposting): सेंद्रिय शेतीस पूरक; शेतीचा कचरा वापरून नैसर्गिक खत तयार करणे.
(७) मशागत सेवा केंद्र / कृषी यंत्र भाडे योजना: ट्रॅक्टर, थ्रेशर, पंप सेट यंत्र भाड्याने देणे. कृषी सेवा केंद्र उघडून खते, बियाणे, कीटकनाशके विक्री.
यामध्ये बहुतेक सर्व प्रकारच्या शेती पुरक व्यवसाय आहे. फक्त जॅगरी प्रोडक्शन, (गुळ उत्पादन) भाजीपाला प्रक्रिया फळप्रक्रिया उद्योग रेशिम उत्पादन औषधी वनस्पती उत्पादन समावेश करता येईल.
